अनिशला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन २ दिवस झाले होते..आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती..त्याला पूर्ण बरे व्हायला अजून १०-१२ दिवस लागणार होते..
समीर आणि गौरी अनिश ठीक आहे कळल्यावर दोन दिवसातच बँगलोरला परतली..शास्त्री काका आणि काकू अजून काही दिवस मुबंईतच राहणार होते..वेदांत ही त्यांच्याबरोबर मुबंईतच थांबणार होता..
समीरच्या खूप मनात आले की, जायच्या आधी एकदा आर्याला भेटावे..पण आता पुन्हा त्याला ह्या सगळ्यात अडकायचे नव्हते..कारण गौरीच्या रुपात त्याला त्याचे खरे प्रेम मिळाले होते आणि आता गौरीला तो गमावू शकत नव्हता..
बँगलोरला पोहोचल्यावर समीरने गौरीला सांगितले की, तो आर्याच्या कंपनीत कामाला होता..म्हणूनच स्निग्धाने त्याला ओळखले आणि RJ अमेय म्हणून अनिश काम करत असलेल्या रेडिओ स्टेशनवर सुद्धा तो पार्ट टाईम नोकरी करत होता म्हणून अनिशही त्याला ओळखत होता.. पण एकाएकी कोणाला ही न सांगता त्याने ह्या दोन्ही नोकऱ्या सोडल्या आणि तो बँगलोरला शिफ्ट झाला..म्हणून कदाचित त्याला अचानक पाहून सगळे चकित झाले होते..असे समीर गौरीला म्हणाला..पण..............
त्याच्या खूप मनात येऊन देखील त्याने गौरीला आर्या हीच ती मुलगी आहे..ज्यामुळे तो मुबंई सोडून बँगलोरला आला होता..हे नाही सांगितले..करण काहीही झाले तरी आर्या ही गौरीची मामेबहिण होती..म्हणजे अगदी जवळची..म्हणून त्याने ही गोष्ट गौरीपासून लपवून ठेवली..
तसे पण कधी कधी काही गोष्टी ह्या गुप्त राहिलेल्याच चांगल्या असतात..म्हणून कदाचित आर्याही गप्प होती..तिचे खरे प्रेम तर अनिशवरच होते ना!!
अमेय हे तिचे फक्त आकर्षण होतं..ते पण जेव्हा तिला कळले की, अमेय हाच समीर आहे.. तेव्हा ती थोड्यावेळासाठी कन्फ्युज जरूर झाली होती..पण जेव्हा तिला रिअलाइझ झाले की, समीर तर तिचा फक्त जवळचा मित्र होता..प्रेम नाही..तेव्हा ती पुन्हा अनिशमध्ये हरवून गेली..प्रेमाचं कसे असते ना!! ते एकाला दुसऱ्याशी आणि दुसऱ्याला तिसऱ्याशी होऊन जातं..मग ते इतके गुंतते की "गुंतता हृदय हे!! अशी कथा बनते..
(१ महिन्यानंतर मुबंईत)
अनिश आता पूर्णपणे बरा झाला होता..काही दिवसांनी अनिश आणि आर्याने अगदी साध्या वैदिक पद्धतीने मंदिरात लग्न केले..अर्थात, घरातील सर्व मंडळींच्या उपस्थितीत..लग्नाला मोजकीच लोकं होती..शास्त्री कुटूंब ही आवर्जून आलं होत लग्नाला..समीरला अचानक दिल्लीला एक कॉन्फरन्स साठी जावे लागले..म्हणून तो काही उपस्थित नव्हता लग्नाला.. पण त्याने आर्या आणि अनिशसाठी गौरी समवेत शुभेच्छा नक्कीच पाठविल्या होत्या..एकदाचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले..आता आर्या जोशीची ऑफिशिअली आर्या अनिश गोडबोले झाली होती..
~समाप्त~
नमस्कार वाचकहो,
"गुंतता हृदय हे!! ही कथा मी २०१९ च्या गणपतीच्या दिवसांत लिहायला घेतली..खरं म्हणजे मी लिहिताना विचारही केलाच नव्हता की, ही कथा इतकी लोकप्रिय होईल आणि मी तिचे दोन पर्व लिहू शकेन..मी कथेचा शेवट खरं तर पहिल्या पर्वातच केला होता..पण काही वाचकांना तो अर्धवट वाटला..म्हणून मी दुसरे पर्व लिहायला घेतले..ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा..तुमच्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की share करा..
©preetisawantdalvi
V v interesting well done
ReplyDeleteThank you so much
DeleteKhup sundar aahey
ReplyDeleteThank you..
Delete