समीर आणि गौरी मुबंईला पोहोचले..शास्त्री काकांनी त्यांना आणायला आधीच गाडी पाठविली होती..त्या गाडीचा ड्राइवर गौरीच्या नावाची पाटी घेऊन उभा होता..दोघेही गाडीत बसले..समीरने मनात विचारही केला नव्हता की, इतक्या लवकर तो परत मुबंईला येईल..कारण काहीही असुदेत, पण तो पुन्हा मुबंईत आला होता..हे मात्र खरे.. जिथे त्याच्यासाठी सगळीकडे फक्त आर्याच्या आठवणी भरल्या होत्या..
गौरी अजूनही शांतच होती..तिने गाडीमध्ये हलकेच स्वतःचे डोके समीरच्या खांद्यावर ठेवले..समीरने ही तिला आधार दिला..काही वेळातच गाडी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली..ते दोघे गाडीतून खाली उतरले..त्यांचे सामान गाडीतच होते..ड्रायव्हरला शास्त्री काकांनी आधीच सूचना दिल्याप्रमाणे तो त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये सोडून त्यांचे सामान घेऊन आर्याच्या घरी ते सामान ठेवायला निघून गेला..
गौरी आणि समीर हॉस्पिटलमध्ये शिरले..हॉस्पिटलमध्ये आता आर्या एकटीच होती कारण अतिरक्तस्रावामुळे अनिशला रक्ताची गरज कधीही भासू शकत होती..म्हणून रक्त कमी पडू नये याकरता शास्त्री काका आणि जोशी काका रक्ताची सोय करायला ब्लड बँकमध्ये गेले होते..तसेच स्निग्धा ही नेमकी पाणी आणण्यासाठी खाली गेली होती..गौरी आणि समीर ऑपेशन थिएटर असलेल्या मजल्यावर आले..
इतक्यात गौरीचा फोन कोणाचातरी धक्का लागून खाली पडला म्हणून ती तो फोन उचलायला खाली वाकली..तितक्यात आर्याची नजर समीरवर गेली..गौरी खाली वाकल्यामुळे आर्याला ती पटकन दिसली नाही..आर्या समीरला बघून इतकी खुश झाली की, काय करावे काय करू नये असे तिला झाले..
समीर पण आर्याला पाहून शॉकच झाला..काही क्षण जणू त्या दोघांसाठी वेळ थांबलाच होता..दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळले..इतक्या दिवसांचं मनात साठवून ठेवलेले सगळे काही अश्रूंच्या रुपात बाहेर पडले..
आर्याला स्वतःवर ताबा ठेवणे जणू मुश्किल झाले होते..तिने धावत जाऊन समीरला मिठी मारली व ती खूप रडू लागली..समीरने ही तिला जवळ घेऊन तिचे सांत्वन केले..
आर्याला विश्वासच होत नव्हता की, ती समीरच्या मिठीत होती..
इतक्यात, गौरीने आर्याला हाक मारली..तशी आर्या भानावर आली...
अरेच्चा!!! हे तर स्वप्न होते..
गौरीने आर्याला मिठी मारली आणि ती रडू लागली..समीर गौरीच्या मागेच उभा होता..आर्याने समीरकडे पाहिले.. समीरला काय बोलावे हेच कळत नव्हते..समीरने स्वतःच्या भावनांवर कसाबसा ताबा ठेवला..
इतक्यात तिथे शास्त्री काका आणि जोशी काका ही आले..
आर्याला समिरशी खूप काही बोलायचे होते..पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते..
इतक्यात स्निग्धाही तिथे आली आणि तिने समीरला पाहताच ती शॉक झाली..
ती म्हणाली, "समीर तू इथे कसा काय?? कुठे गेला होतास यार..किती मिस् केलं आम्ही सगळ्यांनी तुला..तुला अनिशबद्दल कोणी सांगितलं??"
असे विचारून प्रश्नार्थक नजरेने ती समीरकडे पाहायला लागली..
समीर काही बोलणार, तेवढ्यात गौरी म्हणाली, "समीर माझ्याबरोबर आलाय..अनिश जिजूंबद्दल कळल्यावर मी तातडीने इथे यायला निघाली..म्हणून मला सोबत म्हणून तो इथे आलाय.."
स्निग्धाला काय चाललय हे कळतच नव्हते..ती मनातल्या मनात पुटपुटली, "आता ही बया कोण? आणि ती अनिशला जीजू का म्हणतेय? समीर तिच्याबरोबर काय करतोय? बापरे, माझ्या डोक्याचा आता भुगाच होईल..जाऊदेत बाई..बघूया काय होतंय ते"
इतक्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले..त्यांनी आर्याकडे बघून हलकीशी स्माईल केली..आणि ते बोलू लागले, "घाबरायचे काही कारण नाही..अनिश आता धोक्यातून बाहेर आहे..तो मुक्का मार लागल्यामुळे बेशुद्ध झाला होता..तसेच त्याचे इंटर्नल रक्तही खूप गेले त्यामुळे त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली पण आता तो एकदम ठीक आहे..थोडे हातापायाला बँडेज आहे आणि त्याला काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहावे लागेल..१५ दिवसात तो चालयलाही लागेल..त्याला हॉस्पिटल रूम मध्ये शिफ्ट केल्यावर तुम्ही त्याला भेटू शकता"
हे सगळं ऐकल्यावर आर्या खूप खूप खुश झाली..तिने अनिशच्या आई-बाबांना फोन करून आनंदाची बातमी सांगितली..आणि घाई न करता सावकाश हॉस्पिटलमध्ये या असे सांगितले..तिने जोशी काकांना ही मिठी मारली..गौरी आणि समीरही खुश झाले..
थोड्यावेळाने आर्या आणि जोशी काका अनिशला भेटायला आत गेले..समीर एव्हाना शुद्धीवर आला होता..त्याने आर्याला जवळ बोलविले आणि तो मंद हसला व म्हणाला, "आर्या मी ठीक आहे आता..प्लीज रडू नकोस"
आर्याने हो म्हटले आणि त्याच्या हाताचा हलका किस घेतला..इतक्यात गौरी आणि समीर व शास्त्री काका ही आत आले..अनिशने समीरला पाहताच तो भलताच खुश झाला आणि म्हणाला, "अरे, समीर तू इथे कसा?" त्याच्याबरोबर गौरीला आलेले पाहून तो थोडा चकित झाला. तो पुढे म्हणाला,"ही गौरी ना!! पण तू समिरबरोबर?"
आर्या बोलू लागली, "मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन..पण आधी तू आराम कर,बाकी गोष्टी आपण नंतर बोलू"
गौरी आणि समीरने ही अनिशचा निरोप घेतला आणि ते दोघे शास्त्री काकांबरोबर आर्याच्या घरी निघून गेले..
मग स्निग्धा आत आली आणि अनिशला भेटून नंतर परत येते असे सांगून ती घरी निघून गेली..
क्रमश:
@preetisawantdalvi
No comments:
Post a Comment