दिवाना दिल खो गया (भाग १५)

Pic Credit : Google

(इतक्यात दारावरची बेल वाजली. मी बघते असे म्हणत मुग्धा दरवाजा उघडायला गेली.

दरवाजा उघडताच सिलूला समोर बघून मुग्धा फ्रीज झाली. तिला काय आणि कसे रीअॅक्ट व्हावे हेच कळत नव्हते...आता पुढे..) 

सिलू ही मुग्धाला बघतच राहिला. एक क्षण त्याला वाटले की, मुग्धाला घट्ट मिठीत घ्यावे आणि वेळ तिथेच थांबावी. मुग्धाला ही असेच वाटत होते. ते दोघे मनोमनी विचार करत होते...

जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है
गले से लगा लूं लबों पे सजा लूं
तेरे अफ़सानों को अपना बना लूं
दर्द है हल्का सा मगर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है
जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है

दोघेही भान विसरून एकमेकांत गुंतून गेले होते. इतक्यात अम्माचा आवाज आला. “मुग्धा कोण आलय ग?”
पण मुग्धाचे काहीच प्रत्युत्तर आले नाही. मग अम्मा स्वत: च बाहेर आली आणि समोर सिलूला पाहताच तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.
“सिलू” अम्माने जोरात हाक मारली. तेवढयात सिलू भानावर आला आणि त्याने अम्माला गच्च मिठी मारली. तो अम्माला भेटून काही वेळात अगदी लहान मुलासारखा रडू लागला. सिलूला पाहून अम्माला ही रडू कोसळले. त्या दोघांना असे रडताना पाहून मुग्धाचे ही डोळे पाणावले. सिलूने स्वत:ला सावरले आणि तो आप्पांना भेटायला त्यांच्या खोलीत गेला. त्याच्या पाठोपाठ अम्मा ही आत गेली. आज जवळ जवळ एक वर्षांनंतर तो त्याच्या अम्मा-अप्पाला भेटत होता, बघत होता.
 
मुग्धा शांत उभी राहुन त्या तिघांचे प्रेम न्याहळत होती. इतक्यात अम्माचे लक्ष मुग्धाकडे गेले. अम्मा म्हणाली, “मुग्धा तू बोललीस पण नाही की, सिलू आज येणार आहे ते. तू त्याच्या कंपनीमध्ये काम करतेस ना. म्हणजे तुला नक्की माहीत होते हो ना?”
मुग्धा काही बोलणार तेवढ्यात अम्मा म्हणाली, “तुला नक्कीच सिलूने सांगितले असेल नको सांगू म्हणून. त्याला सरप्राइज द्यायचे होते न आम्हाला.” असे म्हणत अम्माने मायेने सिलूच्या डोक्यावरून हात फिरवला.
 
मुग्धा त्या दोघांकडे पाहून मंद हसली आणि अम्माला म्हणाली,  “अम्मा मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी निघते. तुम्ही तुमची आणि आप्पांची काळजी घ्या. मी रोज फोन करेन. आता सिलू आलाय सो मला काही चिंता नाही. येते मी.”
 
मुग्धा निघतच होती. तेवढ्यात अम्माने मुग्धाचा हात पकडला आणि तिला म्हणाली, “मुग्धा बेटा, सिलू आला म्हणून काय झाले. तू रोज येतेस तशीच येत जा. तू जर एक दिवस डोळ्यासमोर दिसली नाहीस ना तर आप्पांना बिलकुल करमत नाही. ते नेहमी म्हणतात जर आपल्याला मुलगी असती तर ती सेम मुग्धा सारखी हवी होती. खर तर बाळा मला ही नाही करमत ग. तू प्लीज येत जा.” असे म्हणून अम्माने मुग्धाच्या कपाळावर किस केले.  
सिलूचा आनंद तर गगनात मावत नव्हता. त्याने हळूच मुग्धाला डोळा मारला. मुग्धाने डोळ्यानेच त्याला गप्प राहण्याचा इशारा केला.
 
मुग्धा निघताच सिलू अम्माला म्हणाला, “अम्मा माझ एक महत्वाचे काम आहे ऑफिस मध्ये. मी अर्ध्या-एक तासात येईन परत” असे म्हणून तो मुग्धा पाठोपाठ निघाला.
 
सिलूने मुग्धाला फोन केला. ती गेट बाहेरच उभी होती. तिला माहीत होते सिलू तिला भेटल्याशिवाय ऑफिसला जाऊच देणार नाही. म्हणून तिने लंच टाइम पर्यंत ऑफिसला येईन असे ऑफिसमध्ये आधीच कळविले होते.
 
सिलूने लगेच साहीलला फोन केला. सिलूला माहीत होते की, साहील घरी एकटाच आहे. म्हणून सिलू मुग्धाला घेऊन तिथेच गेला. त्या दोघांना आलेले बघून साहील काहीतरी कारण सांगून बाहेर निघून गेला. आता साहीलच्या घरात सिलू आणि मुग्धा दोघेच होते.
 
दोघे इतक्या दिवसांनंतर एकमेकांना भेटत होते. सिलूने मुग्धाचा हात घट्ट पकडून ठेवला होता. काय बोलावे हेच त्या दोघांना कळत नव्हते.
सिलू एकसारखा घरभर नजर फिरवत होता. मुग्धाने मनात विचार केला. याच्याने काही नाही होणार. मलाच काहीतरी करावे लागेल.
 
इतक्यात सिलू काही बोलणारच होता की, तेवढ्यात मुग्धाने सिलूच्या ओठांवर ओठ टेकविले आणि मग सिलू ही तिला प्रतिसाद देत तिला कीस करू लागला. दोघेही एकमेकांत पूर्णपणे हरवून गेले होते. त्यांना कोणाचीही फिकर नव्हती.
 
काही क्षणांत दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. सिलू मुग्धावर प्रेमाचा वर्षाव करीत होता. मुग्धाला आता स्वत:वर ताबा ठेवणे अशक्य होत होते. पण सिलू त्याची मर्यादा ओळखून होता. तो हळूहळू मुग्धापासून दूर झाला.
 
मुग्धाने सिलूचा शर्ट घट्ट पकडला होता. तिने सिलूकडे पहिले. पण सिलूने मुग्धाचा शर्ट वरचा हात काढून हातात घेतला  आणि तिच्या कपाळावर कीस केला.
मुग्धाला क्षणभर ओशाळल्यासारखे झाले. तिला कळतच नव्हते की थोड्या वेळापूर्वी तिला काय झाले होते. ती मनात विचार करू लागली. जर थोड्यावेळापूर्वी सिलू थांबला नसता तर.. मुग्धाने लाजून दुसरीकडे बघितले. पण सिलू फक्त मुग्धाला पाहत होता आणि तेव्हा त्याला त्याने ऐकलेल्या एका गाण्याची आठवण झाली.

मिला हूँ अब जो तुम से है
दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला..
तुझे है पाया रब से है
दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला..
हर पल हसीं सा हुआ है
साँसों को तूने छुआ है
बढ़ी तुझसे नज़दीकियाँ सुकून मिला, सुकून मिला..
 
सिलू मनातल्या मनात हसला आणि मुग्धाला म्हणाला, “आय लव यू सो मच मुग्धा”.
मुग्धाने ही त्याला “आय लव यू टू” असे उत्तर दिले.
 
क्रमश:
सिलू आणि मुग्धाच्या प्रेमकथेत पुढे काय काय वळणे येतील हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद)

@preetisawantdalvi

No comments:

Post a Comment