दिवाना दिल खो गया (भाग १४)

Pic credit : Google
 

(अम्माने आप्पांना जेवायला दिले. मुग्धाने अम्माला आप्पांच्या औषधांविषयी सर्व माहिती दिली. ती रोज संध्याकाळी घरी एक फेरी नक्की मारेल असे तिने अम्मा-आप्पांना सांगितले आणि त्यांचा निरोप घेतला. मुग्धा निघून गेल्यानंतर अम्माने मुग्धाविषयी तिच्या मनात आलेले विचार आप्पांना सांगितले. आप्पांना आधी थोडे हसू आले. पण त्यांच्या पण मनात मुग्धा सून म्हणून कायमची या घरात यावी असे वाटत होते. सिलू त्या दोघांच्या शब्दाबाहेर नव्हता. आता पुढे..) 

सिलूचे काम संपले होते. फायनल डॉक्युमेंटेशन बाकी होते. ते त्याचे सहकारी करणार होते. आज खूप दिवसांनी सिलू रीलॅक्स झाला होता. त्याने त्याचा फोन हातात घेतला. इतक्या दिवसात त्याला भरपूर मेलस् आणि मेसेज आले होते. त्याने त्यावर ओझरती नजर टाकली. मुग्धाचा रोज एक मिस् यू आणि लव यू चा मेसेज होता. त्याला ते बघून फार बरं वाटलं.

तो त्याचे मेल्स वाचू लागला. तर त्यामध्ये खूप सारे मेल्स मेडीक्लेम संदर्भात होते. त्याने पटापट ते मेल्स ओपन केले आणि त्यावर असलेले आप्पांचे नाव वाचून तो शॉक झाला. त्याने त्वरित घरी फोन केला. अम्माने फोन उचलला. सिलूचा आवाज ऐकल्यावर अम्माला रडू कोसळले. 

अम्माने सिलूला आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि मुग्धाने त्यांना कसे सावरले आणि कशी मदत केली हे ही सर्व सांगितले. अम्मा तर मुग्धाची तारीफ करताना थकत नव्हती. 

सिलूला एकावर एक शॉक मिळत होते. पण ते सुखद होते. पहिले तर अप्पा इतक्या मोठ्या संकटातून बचावले हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. पण तो अम्मा-अप्पा संकटात असताना त्यांच्या जवळ नव्हता ह्याचे त्याला खूप वाईट वाटले. 

पण सिलूच्या मनात राहुन राहुन हा विचार येत होता की, मुग्धा तिथे कशी पोहोचली. त्याने मुग्धाला लगेच फोन केला. सिलूच फोन आलेला पाहून मुग्धा खूप खुश झाली. त्याचा आवाज ऐकताच तिला रडू कोसळले. सिलूने अम्माला फोन केल्याचे मुग्धाला सांगितले. मग तिने साहील महत्वाच्या कामात अडकल्यामुळे ती कशी सिलूच्या घरी पोहोचली. तसेच अप्पा ठीक होऊन घरी येईपर्यंत काय काय झाले ते सगळे तिने सिलूला सांगितले. 

ध्यानीमनी नसताना अचानक मुग्धा सिलूच्या घरी काय गेली आणि तिने चक्क अम्मा आणि अप्पा दोघांच्याही मनात जागा केली ह्याचे त्याला खूप अप्रूप वाटले. त्याचे मन आता इथे लागत नव्हते कधी एकदा घरी जाऊन अम्मा – अप्पा आणि मुग्धाला भेटतोय असे झाले होते त्याला.

पण त्याच्या ऑफिसच्या कॉंट्रॅक्ट प्रमाणे त्याला त्याचा येण्याजाण्याचा  खर्च स्वत: करावा लागणार होता. कारण २ वर्ष पूर्ण व्हायला अजून एक वर्ष बाकी होते. पण सिलूला त्याची फिकीर नव्हती. त्याने १५ दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि तो त्याच्या बॉसच्या रीप्लाय चा वेट करू लागला. 

ह्या एक वर्षात त्याच्या हुषारीमुळे बॉस त्याच्या कामावर खूप खुश होते. त्यांनी लगेच सिलूची सुट्टी अप्रूव केली. सिलूला बॉसचा मेल आलेला पाहून खूप आनंद झाला. आता मोठे टेंशन होते ते टीकेट्सच. इतक्या कमी वेळात सगळे कसे मॅनेज होईल ह्याचे सिलूला थोडे टेंशन आले. त्याला सुट्टीचा एक दिवस पण फुकट घालायचा नव्हता. 

तो प्रथम त्याचे सगळे काम पूर्ण करून आणि व्यवस्थित वेरिफाय करून कॅनडामधून निघाला. तो काही तासात त्याच्या अमेरिकेत असणाऱ्या घरी पोहोचला. त्याने जॉर्जला फोन करून तो इंडियाला जायला निघणार आहे असे सांगितले. जॉर्ज काही वेळातच सिलूच्या घरी पोहोचला. तेव्हा सिलूने इंडियामध्ये जे जे घडले ते सर्व जॉर्जला सांगितले. मग त्या दोघांनी काही ट्रॅवल ऐजंट्सना कॉल केला. पण तेवढ्यात सिलूला त्याच्या बॉस चा कॉल आला. त्याने सिलूच्या इंडियाला जाणाऱ्या आणि तिथून रिटर्न येणाऱ्या विमानप्रवासाच्या टिकीटाची व्यवस्था केली होती. त्यामुळे सिलू खूपच रीलॅक्स झाला. त्याला उद्याच निघायचे होते. त्याने त्याला लागणारे महत्वाचे सामान पॅक केले आणि तो झोपी गेला. खरतर सिलूला झोपच येत नव्हती. त्याला कधी एकदा घरी जातोय असे झालेले. 

त्याच्या डोळ्यासमोर सारखा मुग्धाचा चेहरा येत होता. त्याने स्वप्नातच मुग्धाला घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओठांवर कीस केले आणि त्याने कानात ईयरप्लग घातले आणि एक रॅनडम गाणे लावून तो ते ऐकू लागला. आज त्या गाण्याचे शब्द ऐकताना ते गाणे जसे काही तो मुग्धासाठी गात आहे असे त्याला वाटत होते.

कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में सभी के लिए
 किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए
 तेरा मिलना है उस रब का इशारा मानो
 मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए
 कुछ तो है तुझ से राबता कुछ तो है तुझ से राबता
 कैसे हम जाने, हमें क्या पता कुछ तो है तुझ से राबता
 तू हमसफ़र है, फिर क्या फिकर है
जीने की वजह यही है मरना इसी के लिए

सिलू सकाळी उठून फ्रेश झाला. त्याला एयरपोर्टवर सोडायला जॉर्ज आणि मीरा दोघेही आले होते. त्याने मुग्धाला मेसेज केला की, तो आज दिवसभर बीजी असणार आहे सो त्याला फोनवर बोलता येणार नाही. म्हणून आज जस त्याला वेळ मिळेल तसा  तो मुग्धाशी मेसेजद्वारे बोलणार होता. मुग्धा थोडी खट्टू झाली. पण तिने स्वत:ला सावरले कारण तिचा रुसवा काढायला सिलू तिच्या जवळ थोडी होता. सिलूची कनेक्टिंग फ्लाइट होती. सिलू घरी जाण्यासाठी खूपच एक्ससाईट झाला होता. कधी हा विमान प्रवास संपतोय असे त्याला झाले होते. सिलूने साहीलला त्याच्या येण्याची खबर दिली होती. साहीलला त्याने फ्लाइट डिटेल्स पण सेंड केल्या होत्या. 

इथे मुग्धा प्रॉमिस केल्याप्रमाणे रोज अम्मा-आप्पांना संध्याकाळी भेटायला येत होती. अम्मा तिला जेवल्याशिवाय पाठवतच नसे. अम्मा मुग्धाचे लाड करायला लागली होती. पण मुग्धाला सारखे मनात विचार येत असत की, जर अम्माला माझ्या आणि सिलूबद्दल कळले तर ह्याच प्रेमाचे रागात रूपांतर होईल आणि मग ती अम्मा – आप्पांना कायमची गमावून बसेल.

पण सध्या तरी ती अम्माच्या प्रेमाचा वर्षाव अनुभवत होती. 

इथे सिलू तब्बल एक वर्षांनंतर भारतात परतला होता. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. रात्री १२.३० ला त्याची फ्लाइट भारतात पोहोचली. सिलूच्या सांगण्याप्रमाणे साहीलने एयरपोर्ट जवळ एका हॉटेलमध्ये रात्रीसाठी रूम बूक केली होती आणि तो पण रात्रभर सिलूबरोबर तिथेच राहणार होता. सिलू फ्रेश झाला आणि त्याने मुग्धाला मेसेज केला. मुग्धा थोडी सिलूवर रागावली होती त्यामुळे तिने मोबाइल चे इंटरनेट बंद ठेवले होते. तसेच फोन ही सायलेंटवर होता. सिलू सुद्धा प्रवासाने खूप थकला होता. साहील शी थोडे बोलून दोघेही झोपी गेले. 

इथे अम्माने आज ब्रेकफास्टमध्ये इडली सांबर बनवले होते आणि तिने मुग्धाला लवकर घरी बोलविले होते. मुग्धा सकाळी सकाळी सिलूच्या घरी पोहोचली. अम्माने लगेच तिला इडली सांबार खायला दिले आणि आप्पांना उठवायला अम्मा बेडरूम मध्ये गेली. इतक्यात दारावरची बेल वाजली. मी बघते असे म्हणत मुग्धा दरवाजा उघडायला गेली.

दरवाजा उघडताच सिलूला समोर बघून मुग्धा फ्रीज झाली. तिला काय आणि कसे रीअॅक्ट व्हावे हेच कळत नव्हते.

क्रमश:

सिलू आणि मुग्धाच्या प्रेमकथेत पुढे काय काय वळणे येतील हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद)

@preetisawantdalvi


No comments:

Post a Comment