(काही तासानंतर सिलू सुखरूप अमेरिकेला पोहोचला. त्याने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला आणि लाइट लावली आणि समोर पाहतो तर मुग्धा उभी होती.
मुग्धा सिलूला पाहून जोरात ओरडली “सरप्राइज”सिलूला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मुग्धाला बघितल्यावर त्याचे डोळे आनंदाने भरून आले. मुग्धाची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. ) आता पुढे..
त्याने मुग्धाला घट्ट मिठी मारली आणि अगदी लहान मुलासारखे तो रडू लागला. मुग्धाने त्याला सांभाळून घेतले. सिलू शांत झाल्यावर मुग्धाने त्याला पाणी दिले आणि ती त्याच्या समोर बसली. सिलूला अजूनही विश्वास होत नव्हता की, मुग्धा त्याच्या इतकी जवळ आहे. तो तिला एकटक निरखून पाहत होता. त्याला क्षणभर वाटले हे स्वप्न तर नाही ना.
पण नाही हे स्वप्न नव्हते. मुग्धा खरच त्याच्या समोर बसली होती. त्याला तिच्याशी कसे आणि काय बोलावे हेच सुचत नव्हते. त्याने मुग्धाचा हात हातात घेतला. इतक्या दिवसात खूप काही अनपेक्षित घडले होते. पण ते सगळे नकारात्मक होते. फक्त एक गोष्ट सोडून ते म्हणजे मुग्धाचे इथे येणे.
ते पण अश्यावेळी जेव्हा त्याला तिची सगळ्यात जास्त गरज होती. मुग्धाने सिलूला त्याच्या जर्मनी ट्रीपबद्दल विचारले आणि अर्थात रोजेलाबद्दल सुद्धा.
पण सिलूला आता ते सर्व आठवून स्वत:चा मूड खराब करायचा नव्हता. त्याने मुग्धाच्या मांडीवर स्वत:चे डोके ठेवले. मुग्धा त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. सिलूला क्षणभर वाटले की, हा क्षण इथेच थांबावा. ती दोघे एकमेकांत गुंतली असताना अचानक दारावरची बेल वाजली व ती दोघं भानावर आली.
सिलूने दरवाजा उघडला तर समोर जॉर्ज आणि मीरा होते. त्यांच्या हातात जेवणाचे पार्सल होते. सिलू काहीवेळात जेवण मागवणारच होता. तेवढ्यात ही दोघे आली. अजूनही मुग्धा इथे कशी आली हे सिलूला समजले नव्हते.
जॉर्ज आणि मीराने मुग्धाकडे बघितले आणि तिघेही हसायला लागले. सिलूला काहीच कळत नव्हते.
मग जॉर्ज सिलूला उद्गारला, “काय मग कसे वाटले सरप्राइज?”
“सरप्राइज ? म्हणजे हे सगळे तुम्ही दोघांनी केले. पण कसे ? आय रीयलि कांट बिलीविट” , सिलू आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
“सगळे नाही. पण हा इथे पोहोचायला मुग्धाला मदत नक्की केली”, मीरा म्हणाली.
“मग मुग्धा बोलू लागली, “ सिलू ह्या दोघांमुळे मी तुझ्यापर्यंत सुखरूप पोहोचू शकले नाहीतर इतक्या मोठ्या देशात मी तुला कसे शोधणार होते.” असे बोलून मुग्धाने मुंबई ते अमेरिका पोहोचण्यासाठी तिने काय शक्कल लढविळी आणि उमाने तिला कशी मदत केली. हे सगळी इत्यंभूत माहिती तिने सिलूला दिली.
सिलूला खर्च मुग्धाचा फार गर्व वाटत होता. पण त्याचबरोबर त्याला मुग्धाचे त्याच्याबद्दल असलेले अस्सीम प्रेम सुद्धा जाणवत होते. त्याने मुग्धाला पुन्हा मिठी मारली. जॉर्ज आणि मीरा जोरात ओरडले आणि त्या दोघांना चीयरअप केले. मग चौघांनी मिळून डिनर केला. मग जॉर्ज आणि मीराला निरोप देऊन सिलू आणि मुग्धाने खोली आवरली आणि मग वेगवेगळ्या खोलीत दोघेही झोपायला गेले.
दोघेही प्रवास करून आल्यामुळे फार थकले होते. त्यामुळे पडल्या पडल्या दोघांची झोप लागली.
त्यांना झोपून काही तास उलटले असतील. इतक्यात रात्री कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होते. आवाजाने दोघांची झोपमोड झाली. दोघेही एकत्र दाराकडे धावले.
पुढे पाहतात तर काय????
क्रमश:
(नक्की कोण होते दरवाजात? पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. जमल्यास स्टीकर्स सहित प्रोत्साहन जरूर द्या. धन्यवाद)
@preetisawantdalvi
No comments:
Post a Comment