सिलूचा ऑफिसचा आज पहिला दिवस होता. त्याच्या ऑफिसमध्ये बऱ्यापैकी
इंडियन स्टाफ होता. पण सध्यातरी तो फक्त विनीतला ओळखत होता.
विनीतने सिलूला त्याची केबिन दाखविली आणि अर्ध्या
तासाने मीटिंग आहे व तिथेच त्याची त्याच्या डिपार्टमेंटमधल्या सर्व सहकाऱ्यांची ओळख होईल असेही तो
म्हणाला.
काही वेळानंतर सिलू कॉन्फरन्स रूम मध्ये
पोहोचला. विनीतने प्रथम सिलूची ओळख सर्व सहकाऱ्यांशी करून दिली त्यानंतर सगळेजण
आपापली ओळख सांगू लागले. सिलूला सगळ्यांना भेटून थोडा धीर आला. त्याच्या
डिपार्टमेंटमध्ये सुधीर, मीरा, जॉर्ज हे तीन
सहकारी इंडियन होते. सुधीर ह्या
कंपनीमध्ये ३ वर्षांपासून होता आणि तो इथेच सेटल झाला होता. जॉर्ज आणि मीरा यांना
ही कंपनी जॉइन करून १ वर्ष होत आलेलं. एकंदर सिलूला यांच्यामुळे परके वाटणार
नव्हते.
सिलूच्या कामाला जोमाने सुरुवात झाली. इंडियन टाइम आणि अमेरिकन टाइम सांभाळून तो घरी अम्मा-अप्पाला फोन करीत असे. तसेच मुग्धाशी ही ठरलेल्या वेळेवर बोलणे होत असे.
असेच काही महीने निघून गेले. हळूहळू तो इथल्या वातावरणात रमू लागला होता. मीरा, जॉर्ज आणि सिलूची चांगली गट्टी जमली होती. सुधीर ह्या सगळ्यांपेक्षा थोडा सीनियर होता. तसेच त्याची फॅमिली सुद्धा होती त्यामुळे तो ह्या तिघांमद्धे जास्त मिसळत नसे. जॉर्ज आणि मीरा लिव-इन कपल होते. त्यामुळे ती दोघे जास्तीतजास्त वेळ एकमेकांबरोबर घालवत असत. त्या दोघांना बघितले की, सिलूला मुग्धाची खूप आठवण येई. मुग्धाबद्दल एव्हाना सिलूने जॉर्ज आणि मीराला सांगितले होते.
ती दोघे मुग्धाला अमेरिकेत येण्याचा नेहमी सल्ला देत असत. त्यांचे ऐकून मुग्धाला ही क्षणभर वाटे की, सगळं सोडून सरळ सिलूकडे अमेरिकेला निघून जावे. पण सध्यातरी ते तिला शक्य नव्हते.
मुग्धा सुद्धा तिच्या ऑफिसच्या कामात व्यग्र असे.
जर तिला सिलूची खूपच आठवण झाली तर कॉफी शॉप किंवा चौपाटी ही तिची ठरलेली एकांतात बसायची
ठिकाणे असत. कधी कधी उमा ही तिला कंपनी द्यायला तिच्याबरोबर येत असे.
असेच सहा महीने निघून गेले. सिलू आणि मुग्धा यांनी एव्हाना एकमेकांना कामात बरेचसे व्यस्त करून घेतले होते. त्यामुळे फक्त एकमेकांशी बोलण्याइतपत ते वेळ काढत असत.
सिलूच्या कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट मिळाले होते आणि याची सगळी जवाबदारी ही सिलूवर देण्यात आली होती. तसेच यासाठी त्याला १ महिना जर्मनीच्या ऑफिस मध्ये काम करावे लागणार होते. त्याची राहण्याची आणि जेवणाची सगळी व्यवस्था ऑफिस करणार होते. सिलूने हे मुग्धाला कळविले. मुग्धा खूपच एक्ससाइट झाली. सिलूला नवीन नवीन देश फिरायला मिळत आहे त्याचे तिला अप्रूप वाटत होते.
सिलूबरोबर ह्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एक
सहकारी नेमला गेला होता. त्या दोघांना मिळून हा प्रोजेक्ट एक महिन्यात पूर्ण करायचा
होता. सिलू फ्लाइटने जर्मनीला पोहोचला. तिथून तो महिनाभर ज्या हॉटेलवर थांबणार होता
तो तिथे पोहोचला. त्याची त्या सहकार्याबरोबर लंच साठी भेट होणार होती. सिलू वेळेवर
त्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचला. त्याच टेबल हे आधीच रिजर्व होते. त्याने घड्याळाकडे
एक नजर टाकली तो ५ मिनिट लवकर आला होता.
जेमतेम २ मिनिट्स झाले असतील तेवढ्यात एक मधुर
आवाज त्याच्या कानावर पडला.
“गुड आफ्टरनून मिस्टर सिलू”
सिलूने वर पाहिले आणि तो पाहातच राहिला. त्याच्या
समोर एक सुंदर गोरीपान मुलगी उभी होती. तिने फॉर्मल कपडे घातले होते. तिचे केस तर इतके
सिल्की आणि शाइणी होते की विचारू नका. तिने हलकासा मेकअप केला होता. ती इतकी सुंदर
होती की, जणू स्वर्गातली अप्सराच!! सिलूची नजर तिच्यावरून क्षणभर हटलीच नाही.
पण तो काहीवेळातच भानावर आला. सिलूने त्या मुलीला बसायला सांगितले. तिने मग स्वत:ची ओळख सिलूला करून दिली. तिचे नाव रोजेला होते. तिची आई इंडियन आणि वडील जर्मन त्यामुळे रोजेलाला इंडियाची बरीच माहिती होती. तसेच इंडिया बद्दल आकर्षण ही होते. पण ती कधीही इंडिया मध्ये गेली नव्हती. परंतू तिच्या आईकडून इंडिया मधल्या कहाण्या ती रोज ऐकत असे.
आज तिला प्रथमच एका इंडियन व्यक्ति बरोबर आणि
ते पण १ महिना काम करण्याची संधी मिळणार होती म्हणून ती
भरपूर खुश होती. तिने एकादमात सिलूला स्वत:बद्दल
सर्व सांगून टाकले.
सिलू तिच्या बोलण्याने खूपच प्रभावित झाला. त्याने ही तिला स्वत:च्या फॅमिली आणि मुग्धाबद्दल सांगितले. हे ऐकून रोजेला खूप आनंदी झाली. मग त्यांनी लंच आटपला आणि मग लॉबीमध्ये बसून त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चा करू लागली.
लॉबीमध्ये त्यांना हवी तेवढी शांती मिळत नव्हती
मग त्या दोघांनी कधी तुझ्या तर कधी माझ्या असे ठरवून रूम मध्येच चर्चा करण्याचे ठरविले.
सिलूने रात्रीच मुग्धाला रोजेला बद्दल सांगितले. सिलूला त्याच्या रिलेशनशिपमध्ये कोणताही आडपडदा ठेवायचा नव्हता. तसे तर मुग्धाला सिलूवर पूर्ण विश्वास होता. पण तरीही सिलूला माहीत होते की, लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवायची असेल तर जे आहे ते सर्व शेअर करणे जरूरी आहे.
सिलूने उगाचच रोजेला ची तारीफ मुग्धाजवळ केली की, ती किती सुंदर आहे वगैरे वगैरे. त्याला वाटतले मुग्धा चिडेल. पण मुग्धाने तसे काहीच रियॅक्ट केले नाही. उलट तिने सिलूला एक सॉन्ग रेकॉमेंडेशन सेंड केले आणि ते सॉन्ग त्याला ऐकायला सांगितले.
सिलूने झोपताना ते सॉन्ग प्ले केले. त्या सॉन्गचे
बोल होते.
♬♬ हम तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे बिन
क्या वजूद मेरा
तुझसे
जुदा गर हो जाएंगे तो ख़ुद से ही हो जाएंगे जुदा
क्यूंकि
तुम ही हो अब तुम ही हो ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी मेरी आशिक़ी अब तुम ही हो ||
तेरा
मेरा रिश्ता है कैसा एक पल दूर गवारा नहीं
तेरे
लिए हर रोज़ हैं जीते तुझ को दिया मेरा वक़्त सभी
कोई
लम्हा मेरा ना हो तेरे बिना हर सांस पे नाम तेरा..
क्रमश:
(सिलू आणि मुग्धाची लवस्टोरी अशीच सुरू राहील. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा आणि हो, हा भाग आवडला तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.)
धन्यवाद
@preetisawantdalvi
Hi vahini,
ReplyDeleteMi surv story read keli 1st part pasun 7th part paryant kup chan ahi
All parts are awesome waiting for next
ReplyDeleteAll parts are awesome waiting for next
ReplyDelete