दिवाना दिल खो गया (भाग ८)

 


सिलूचे काम आता बऱ्यापैकी पूर्ण होत आलेले. रोजेला ही सुद्धा सिलूची खूप चांगली मैत्रीण बनली होती. सिलूला सोईस्कर व्हावे यासाठी रोजेला तिचे घर जर्मनीमध्ये असताना सुद्धा हॉटेल मध्ये राहात होती. काम संपल्यावर ती सिलूला जेवढे जमेल तितके जर्मनी फिरवणार होती आणि हो त्यांच्याबरोबर जमेल त्या वेळेला व्हिडियो कॉलच्या माध्यमातून मुग्धा ही असणार होती. 

मुग्धा सिलूला खूपच मिस करत होती. अमेरिकेला प्रवासी व्हिसावर जाणे मुग्धाला काही अवघड नव्हते. पण घरातले तिला एकटे ते पण परक्या देशात फिरायला पाठवायला मिळूच तयार नव्हते. तिचे एकदा येण्याचे ठरले असते मग पुढची मदत जॉर्ज आणि मीरा तिला करणारच होते. जेणेकरून सिलूला सर्प्राइज मिळेल. मुग्धा रोज हाच विचार करत होती की, सिलूला कसे भेटायला जाता येईल. 

पण म्हणतात ना,  “अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है” अगदी तसंच काही मुग्धाच्या बाबतीत घडलं. उमाला तिच्या ऑफिसच्या ट्रेनिंगसाठी १५ दिवस अमेरिकेला जावे लागणार होते. काही निवडक सहकाऱ्यांपैकी उमाची निवड झाली होती. परदेशात एकदातरी जायला मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. उमाचे स्वप्न आता पूर्ण होणार होते. तिने ही बातमी कळताच मुग्धाला फोन केला. मुग्धा तर इतकी खुश झाली की विचारू नका.

उमाशी बोलून मुग्धाने फोन ठेवला आणि मग एक कल्पना तिच्या डोक्यात आली. तिने पुन्हा उमाला फोन करून कॉफी शॉप मध्ये बोलविले. उमा घाईतच तिथे पोहोचली. तिने मग सगळी कल्पना उमाला सांगितली. उमाला थोडी ती रिस्की वाटली पण मैत्रिणीच्या आनंदासाठी ती सुद्धा तयार झाली. मग काय दुसऱ्या दिवशीच मुग्धाने उमाला समोर ठेवून अमेरिकेला फिरायला जायची परवानगी घरच्यांकडे मागितली आणि उमा बरोबर आहे मग त्यानीही होकार दिला.

मुग्धाचा आनंद गगनात मावत नव्हता. पुढील १५ दिवसांनी तिचे अमेरिकेचे फ्लाइट होते आणि सगळ्यात चंगली गोष्ट म्हणजे ती आणि उमा एकाच फ्लाइटमधून प्रवास करणार होत्या. तिने ही बातमी मीराला कळविली आणि सिलूपासून ही बातमी लपवून ठेवावी ही विनंती केली. सिलू १५ दिवसांनी जेव्हा अमेरिकेत परत येणार होता तेव्हा त्याच्यासाठी एक मोठे सर्प्राइज तयार होते आणि ते म्हणजे मुग्धा !! 

सिलू एक शांत, संस्कारी आणि सुस्वभावी मुलगा होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा होता तो. मग रोजेला हिला तर सिलूचा एक महिन्याचा सहवास मिळाला होता. तर मग ती सिलूच्या प्रेमात नाही पडणार असे कसे बारे नाही होणार!!

जर्मनीमधले काम संपायला अजून एक आठवडा बाकी होता. पुढचे ७ दिवस खूपच महत्वाचे होते म्हणून काही दिवस तरी सिलूला मुग्धाला हवा तसा वेळ देता येणार नव्हता. त्याने मुग्धाला तसे सांगितले मग मुग्धाने ही त्याला समजून घेतले.

सिलू दिवसरात्र त्या प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे होता. त्याला खाण्यापिण्याचीही  शुद्ध नव्हती. रोजेला कामाबरोबर सिलूच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देत होती. तिला माहीत होते की, सिलूचे मुग्धावर खूप जास्त प्रेम आहे आणि आता एक आठवड्यानंतर सिलूला पुन्हा कधी भेटता येईल ह्याची तिला शाश्वती नव्हती. पण रोजेला मनातल्या मनात सिलूवर प्रेम करायला लागली होती. तिला सिलूचा सहवास हवाहवासा वाटत होता. रोजेला इतकी सुंदर होती की, दूसरा कोणी तरुण असता तर तो आतापर्यंत रोजेलाच्या बाहुपाशात असता. पण सिलू असा नव्हता तो रोजेलाकडे एक चांगली मैत्रीण म्हणूनच पहात होता.

आज सिलूने लाइट ब्ल्यू कलरचे शर्ट घातले होते. तो आज रोजच्यापेक्षाही हॅंडसम दिसत होता. रोजेला ला क्षणभर त्याला बघण्याचा मोह आवरला नाही. तिला असे वाटले की, सिलूला घट्ट मिठी मारावी आणि त्याच्यावर सर्वस्व वाहून टाकावे. पण तिने स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवला. आज तिचे कामात लक्षच नव्हते. सिलू जे बोलत होता ती फक्त हा ना इतकेच बोलत होती.

काहीवेळानंतर सिलूच्याही हे डोक्यात आले त्याने रोजेला ला विचारले, “रोजेला आज तुझे कामात अजिबात लक्ष नाही आहे. तू ठीक आहेस ना? तुला बरे वाटत नसेल तर आपण उद्या कंटिन्यू करूयात का काम?”

पण रोजेलाचे आज लक्षच नव्हते म्हणून सिलूने तिच्या खांद्याला धरून तिला हलविले. तर रोजेलाने कसलाही विचार न करता सिलूला मिठी मारली. सिलूसाठी हे अनपेक्षित होते. त्याने तिला लागलीच बाजूला केले. पण रोजेला ला आता तिच्या भावनांवर ताबा मिळविणे कठीण जात होते. तिने पुन्हा सिलूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

क्रमश:

(रोजेला आणि सिलू यांमध्ये काही अघटित तर घडणार नाही ना आणि मग मुग्धा तिचे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया ह्या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यन्त हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडल्यास त्याला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.)

@preetisawantdalvi

No comments:

Post a Comment