ऋषीपंचमी ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी साजरी करतात..
माझे माहेरचे गौरी-गणपती माझ्या काकांकडे येतात..जिथे आम्ही सर्व पहिल्या दिवशी पाया पडायला सहकुटूंब जातो..
त्यामुळे दुसऱ्या दिवशी ऋषी ची भाजी करण्याची सवड माझ्या आईला मिळते..
ह्या ऋषी पंचमी बद्दल मी माझ्या काही आठवणी तुम्हाला सांगणार आहे..
मला अजून आठवते, माझ्या लहानपणापासून माझ्या माहेरी ह्या दिवसाचे खूप महत्व..
म्हणजे माझी आजी आमच्याकडे मोठ्या पातेल्यात ऋषी ची भाजी बनवत असे..त्यासाठी ती आईबरोबर जाऊन आदल्यादिवशीच वेगवेगळ्या भाज्या, कणसे आणत असे आणि मग ऋषीपंचमी दिवशी ती भाजी शिजवून शेजाऱ्यांना वाटत असे.
आजी गेल्यानंतरही माझ्या आईने ही प्रथा चालू ठेवली..
ती अजूनही आदल्या दिवशी सर्व भाज्या आणून नीट करून ठेवते..यासाठी आमच्या शेजारच्या काही काकी ही तिला भाजी नीट वाट करायला मदत करतात..
मग दुसऱ्या दिवशी आई ती भाजी मोठ्या पातेल्यात शिजवून मग शेजाऱ्यांना वाटते..आणि सर्वजण ती भाजी आवडीने खातात..या दिवशी आमच्या घरी ऋषी ची भाजी आणि भात सोबत पापड, लोणचे असे जेवण असते..आमच्याघरी ही आम्ही सगळे ही भाजी आवडीने खातो..मला सर्वात जास्त त्या भाजीमधले मक्याचं कणीस आवडतं😋
पण आता मला दरवर्षी ऋषी पंचमीला माहेरी जात येत नाही..त्यामुळे मी ऋषी ची भाजी खूपच मिस करते..😎😔

माझे लग्न झाल्यावर मी जेव्हा पहिल्याच वर्षी माझ्या सासरच्या गावी गणपतीला गेले होते..तेव्हा मला माझ्या सासरची ऋषीपंचमी ची वेगळीच रीत कळली..इथे ऋषीपंचमी च्या दिवशी सगळ्या वाडीतील बायका अर्ध्या दिवसाचा उपवास करतात. सासरी आमच्याच घरी ऋषीपंचमी साजरी केली जाते..इथे प्रथम सकाळी वयस्क बायकांना अंघोळ घातली जाते..त्यांची पूजा केली जाते...तसेच नवीन नवरी असेल तर ती तिच्या पहिल्या ऋषीपंचमी ची आठवण म्हणून त्या बायकांना काही भेटवस्तू ही देते आणि त्यांचे आशिर्वाद घेते....त्यानंतर सगळ्या वाडीतील सर्व बायका मिळून ऋषीची भाजी, भात असे जेवण बनवतात..आणि मग एकत्र बसून एकमेकांना जेवण वाढून ते जेवून उपवास सोडतात..
ही होती, माझ्या माहेरची आणि सासरची ऋषीपंचमी!!
कसा वाटला माझा लेख?
तुमच्याकडे ऋषीपंचमी कशी साजरी करतात? हे मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा..

||गणपती बाप्पा मोरया|| 🌺🌺
(हा ब्लॉग आवडल्यास तो आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा..धन्यवाद)
@preetisawantdalvi
उत्तम प्रकारे माहिती सांगितलेत. वाचायला आवडले. मस्तच
ReplyDeleteधन्यवाद😊
Deleteवाह..मला प्रत्येकाच्या प्रथा, परंपरा वाचायला आवडतात.. खुप सुंदर लिहिलंय
ReplyDeleteधन्यवाद😊
ReplyDeleteछान माहिती दिलीत.👌
ReplyDeleteधन्यवाद🙂
DeleteMastachhh😍😍😍
ReplyDeleteनवीन माहिती समजली छान.
ReplyDeleteकाही रूढी,चालीरीती ह्या परंपरागत पुढे गेल्याच पाहिजते
धन्यवाद🙂
Deleteसुंदर वर्णन!
ReplyDelete