(सिलू मुग्धाला जेवण वाढायला मदत करायला गेला तर तिने खुणेनेच त्याला बसायला सांगितले. तिला अजून काही चुकी करून अम्माचा रोष वाढवून घ्यायचा नव्हता. त्यामध्ये तिच्या मते अजून अम्माला त्या दोघांबद्दल काहीही माहीत नव्हते. त्यामुळे तिला थोडे जपून वागावे लागत होते. आता पुढे..)
सगळे जेवायला बसले. आज सगळे जेवण मुग्धाच्या आवडीचे होते. सिलूला सुद्धा साऊथ इंडियन टच असलेले महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण पाहून थोडे आश्चर्य वाटले. यावरून मुग्धाला अम्माने पूर्णपणे अॅक्सेप्ट केले आहे हे जाणून तो मनातल्या मनात आनंदी झाला. मुग्धा सुद्धा जेवणात असलेले तिचे आवडीचे पदार्थ पाहून खुश झाली. तिचे डोळे भरून आले, कारण सगळे जेवण आज अम्माने केले होते. ते पण खास तिच्यासाठी.
मुग्धाला असे भावुक झालेले पाहताच अम्मा मुग्धाजवळ गेली आणि तिने मुग्धाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला आणि मग ताटातला घास तिला भरवला. अम्माचे आज सिलूकडे लक्षच नव्हते आणि अप्पाकडे सुद्धा. दोघे बाप-बेटे एकमेकांना काय हवे ते स्वत:च वाढून घेत होते.
काहीवेळानंतर सर्वांची जेवणे झाली. मग मुग्धाने अम्माला किचन आवरायला मदत केली. मग सर्वजण गप्पा मारत बसले. अम्मा मुग्धाला म्हणाली, “थॅंक यू मुग्धा तू आमच्या आयुष्यात आलीस आणि घरातले वातावरण आनंदमय झाले. आता काही दिवसात सिलू पुन्हा अमेरिकेत जाईल आणि मग आम्ही दोघे पुन्हा एकटे पडू. म्हणून मी सिलू अमेरिकेला जायच्या आधी त्याचा साखरपुडा उरकून घ्यायचे ठरविले आहे. मुलगी मी बघितली आहे आणि मला माहीत आहे की, सिलू सुद्धा माझ्या शब्दाबाहेर नाही. मी जी मुलगी पसंद करेन तिच्या गळ्यात तो न बोलता माळ घालेल. पण इतक्या कमी वेळात मला साखरपुड्याची तयारी झेपेल असे वाटत नाही. त्यात अप्पा पण अजून पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे मला ह्या सगळ्यात तुझी मदत हवी आहे. तुला वेळ असेल तर उद्या माझ्याबरोबर खरेदीला येशील का? मी आणि अप्पाने तुला स्वत:ची मुलगीच मानले आहे. म्हणून सिलूच्या होणाऱ्या बायकोसाठी सगळे तुझ्या पसंतीचे घ्यायचे आहे.” असे बोलून अम्माने मुग्धाकडे बघितले. मुग्धाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
मग अम्मा पुढे म्हणाली, “अग आजकालच्या तुम्हा मुलींना आमची ओल्ड फॅशन थोडी ना आवडणार म्हणून तुला खरेदीला नेत आहे. येशील ना? अम्मा हसू दाबत म्हणाली.
बिचारी मुग्धा अम्माला काय उत्तर द्यावे हा विचार करू लागली. तिने सिलूकडे पाहिले पण सिलू शॉक झाल्यासारखा मुग्धाकडे बघत होता. मग अम्माने परत विचारले, “येशील न मुग्धा?”
पण मुग्धाने खोटे खोटे हसत हो म्हटले आणि मला उशीर होतोय घरी जावे लागेल असे म्हणत कोणी काही बोलायच्या आत ती निघून पण गेली. सिलूसाठी सुद्धा हे अनपेक्षित होते. तो ही मुग्धाच्या मागे गेला. पण तो गेटच्या बाहेर येईपर्यंत मुग्धा ऑटोमध्ये बसून निघून गेली होती. सिलूने मुग्धाला फोन लावला पण मुग्धा तो सारखा कट करीत होती. काहीवेळाने तर मुग्धाचा फोन स्विच ऑफ यायला लागला. सिलूला अम्माचा खूप राग येत होता. त्याने विचार केला की, अम्माने तर मुग्धाला सून म्हणून स्वीकार केले होते मग हे काय झाले. मला अम्माशी बोलावेच लागेल. मी मुग्धाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही. सिलू उदास मनाने घरी आला आणि बघतो तर अम्मा-अप्पा दोघेही मोठमोठ्याने हसत होते. सिलूला काहीच कळत नव्हते नक्की काय चाललाय ते.
सिलूला आलेले पाहाताच दोघेही गंभीर झाले. सिलूला थोडा रागच आला. त्याने सरळ त्या दोघांकडे दुर्लक्ष केले आणि तो त्याच्या खोलीत जाणारच होता की, अम्माचा मागून आवाज आला. ती सिलूला म्हणाली, “सिलू उद्या आपल्याला मुग्धाला बघायला तिच्या घरी जायचे आहे. सकाळी जरा लवकर उठून तयार रहा आणि ह्याबद्दल मुग्धाला काही सांगितलेस तर खबरदार.” असे म्हणून अम्मा आणि अप्पा दोघेही हसत त्यांच्या खोलीत झोपायला गेले.
सिलू अम्माने काढलेले उद्गार ऐकल्यावर चकित झाला आणि त्याचबरोबर खूप खूप आनंदी. तो मनात विचार करू लागला, “म्हणजे मगाशी अम्मा ज्या मुलीबद्दल बोलत होती ती मुग्धा आहे आणि मी समजलो की, दुसरी कोणीतरी अम्माने माझ्यासाठी पसंद केली. मी किती चुकीचे समजलो अम्माला. आय एम वेरी सॉरी अम्मा-अप्पा. आय लव यू सो मच.”
असे बोलून त्याने पुन्हा मुग्धाचा नंबर डायल केला पण तो परत स्विच ऑफ होता. त्याने ५-६ वेळ पुन्हा ट्राय केला पण प्रत्येक वेळी सेम मेसेज ऐकायला येत होता. सिलूला खूप टेंशन आले. त्याला जरी सगळे खरे माहीत असले तरी मुग्धाला अजून काहीही माहीत नव्हते. त्यामुळे ती मनापासून हर्ट झाली असणार हे सिलू जाणून होता. आता त्याच्याकडे सकाळची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.
सिलू बेडवर आडवा झाला आणि त्याने अंगावर
पांघरून घेतले आणि मोबाइल वर मुग्धाचे फोटो पाहत त्याचे आवडते गाणे गुणगुणू लागला.
♬दीवाना दिल खो गया, बेगाना दिल हो गया
दीवाना
दिल खो गया, बेगाना दिल हो गया
मुझे
चैन नहीं बेचैन हूं मैं, बस ये मेरा दिल खो गया
दीवाना
दिल खो गया, बेगाना दिल हो गया♬
इथे मुग्धा घरी आली. तर आज हॉलमध्ये आई-बाबा तिची वाट पाहत बसलेले. मुग्धाला पाहून ते तिला काही बोलणार होते पण मुग्धाने त्यांच्याकडे लक्ष न देता ती तडक तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला व बेडवर पालथी पडून रडू लागली. काहीवेळाने मुग्धाच्या आईने मुग्धाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण तो उघडा होता. तिच्या आईने आत जाऊन पहिले तर मुग्धा डोक्यावर पांघरून घेऊन झोपली होती. मुग्धाला झोपलेले पाहून तिची आई झोपायला स्वत:च्या खोलीत गेली.
पण मुग्धा झोपली कुठे होती. ती तर सिलूचा विचार करत होती. तिला माहीत होते की, सिलू कधीही त्याच्या अम्माच्या शब्दाबाहेर जाणार नाही. जर सिलूने तिला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले तर.. हा विचार ही आता तिला असह्य होत होता. ती सिलूचा फोटो घट्ट छातीशी कवटाळून एकसारखी रडत होती आणि म्हणत होती की, “आय लव यू सिलू. आय कांट लिव्ह विदाऊट यू.”
क्रमश:
मुग्धाला जेव्हा सत्य
समजेल तेव्हा तिची काय रिएक्शन असेल हे वाचण्यासाठी त्यासाठी सिलू आणि मुग्धाच्या
प्रेमाची साक्ष देणारी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की
कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. जमल्यास
स्टीकर्स सहित प्रोत्साहन जरूर द्या. धन्यवाद)
@preetisawantdalvi
No comments:
Post a Comment