दिवाना दिल खो गया (भाग ४)


सिलूचे हे पुढचे चार दिवस भलतेच व्यस्त जाणार होते. त्याला त्याच्या बॅगेत सध्या तरी गरजेचे सर्व सामान भरणे आवश्यक होते.

कारण कंपनी पॉलिसीनुसार पुढचे वर्ष तरी सिलूला भारतात येता येणार नव्हते आणि तशीच काही एमर्जन्सि आली तर त्याला स्वत:च्या खर्चाने येण्या-जाण्याचा प्रवास करावा लागणार होता. 

आज त्याचे मामा-मामी त्याला शुभेच्छा द्यायला घरी आले होते. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. जेवण आटोपल्यावर सगळे गप्पागोष्टी करायला बसले. थोडावेळ झाल्यावर सिलूने मामा-मामीचा आशीर्वाद घेऊन त्यांचा निरोप घेतला आणि मग तो त्याच्या खोलीत आराम करायला गेला.

त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि मेसेज बॉक्स ओपन केला तो मुग्धाबरोबर केलेला पहिला संवाद वाचू लागला. तो वाचता वाचता मनोमनी हसत होता. तो विचार करीत होता की, ज्या मुलीला तो इतके दिवस न्याहळत होता. तिच्याशी एक शब्द बोलता यावा ह्यासाठी तरसत होता. त्याच मुलीने त्याला चक्क प्रपोस केले होते. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण तर होते पण ही सत्य परिस्थिती होती.

पण राहून राहून त्याला उद्या मुग्धा काय उत्तर देणार याची चिंता वाटत होती. त्याला हे माहीत होते की, कोणतीही मुलगी अशा मुलासाठी का थांबेल, जो वर्ष साता-समुद्रा पलीकडे असेल. ज्याच्याशी फक्त फोनवर बघता-बोलता येईल पण त्याला प्रत्यक्ष भेटता येणार नाही.

ह्या गोष्ठी बोलताना जरी सोप्या वाटल्या तरी त्या जो अनुभवतो त्याचे त्यालाच माहीत!!

प्रेमामध्ये पण किती इमोशन असतात ना. तुम्ही पण हे कधीतरी नक्की अनुभवले असणार. म्हणजे बघा ना, कधी कधी आपल्याभोवती सगळेजण असतात, तरी त्या एका खास व्यक्तीची उणीव तुम्हाला नेहमी भासते. प्रत्येक सुख-दु:खात  त्या व्यक्तीने तुमच्या आसपास असावे असे वाटत राहते. तर कधी कधी त्या व्यक्तीला किती बघितले तरी मन भरत नाही. तर कधी त्या आपल्या वाटणाऱ्या व्यक्तीबरोबर एकांत हवाहवासा वाटतो. तर कधी किती बोलले तरी अजून बोलावेसे वाटते. असे वाटते की हे बोलणे कधी संपूच नये.

पण तो व्यक्ति आपल्या आसपास तर असतो. कधीतरी आपण त्याला भेटू तरी शकतो. पण सिलू-मुग्धाच्या बाबतीत ते पण शक्य नाही. जर एखादा चमत्कार झाला तर......हे नक्की शक्य होईल ना.

पण एक मिनिट त्यासाठी ही मूवी नाहीये. ही तर एक असामान्य अशी प्रेमकहाणी आहे. सिलू आणि मुग्धाची.

सिलू आणि मुग्धा दोघेही कॉफी शॉपमध्ये भेटले. त्यांनी आपापली आवडती कॉफी मागवली. आज त्यांची ही प्रत्यक्षातली शेवटची भेट होती. आता जर मुग्धाचं उत्तर हो असेल तर ते वर्षानी पुन्हा भेटणार होते. काहीवेळ दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बसले होते.

काहीवेळानंतर मुग्धाने एक कागद सिलूला दिला. सिलूने तो उघडला आणि त्याला मुग्धाचे उत्तर मिळाले.

माहीत आहे त्यामध्ये काय लिहिले होते.

Dear Silu,   

Though we’re apart, You’re in my heart.

Sweet memories….Keep haunting me,

And deep in my soul, I know you’re mine,

And my heart Belongs To you. (Your love & life, Mugdha)

प्रिय सिलू,

जरी आपण वेगळे असलो, तरी तू माझ्या हृदयात आहेस. तुझ्या गोड आठवणी मला नेहमी त्रास देत असतात आणि माझ्या अंतर्मनात खोलवर, मला माहित आहे की, तू फक्त माझा आहेस, आणि माझे हृदय तुझ्याशी जोडलेले आहे.

(तुझे प्रेम आणि तुझे जीवन मुग्धा)

क्रमश:

(हा भाग थोडा शॉर्ट होता पण इमोशने भरलेला होता. पुढे काय होईल हे तुम्हाला लवकरच कळेल. तोपर्यंत हा भाग आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा.)

धन्यवाद

@preetisawantdalvi

 


 

No comments:

Post a Comment