RIP 🙏The great Playback Singer #SPBalsubramaniam sir
एसपी बालसुब्रमण्यम सर हे एक भारतीय संगीतकार, उत्कृष्ठ गायक, अभिनेता, डबिंग आर्टिस्ट, फिल्म प्रोड्यूसर होते. त्यांची कारकीर्द लक्षात घेता त्यांनी आतापर्यंत तेलगू, तमिळ, कन्नडा, हिंदी आणि मल्याळम या विविध भाषांतील चित्रपटात काम केले होते. तसेच त्यांनी १६ भारतीय भाषांमध्ये ४०,००० च्या वर गाणी गायली आहेत. त्यांना आतापर्यंत तेलगू, तमिळ, कन्नडा आणि हिंदी अशा ४ विविध भाषांमध्ये उत्कृष्ट गायक म्हणून ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांच्या तेलुगु चित्रपटामधील उत्तम कामगिरीबद्दल आंध्रप्रदेश राज्याने २५ वेळा नंदी पुरस्काराने तर कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनीदेखील असंख्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याचबरोबर त्यांना भारतीय सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण ह्या प्रतिष्ठित पुरस्काराने ही त्यांना सन्मानित केले आहे.
अशा ह्या आदरणीय एसपी बालसुब्रमण्यम सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🌸🌸
No comments:
Post a Comment