![]() |
| सगळ्या सणांचा राजा आला श्रावण माझा!! |
||श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे।।
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना.
ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात पौर्णिमेपासून आकाशात श्रवण नक्षत्राचे योग्य तयार होतात, त्याच श्रवण नक्षत्राच्या नावावरून ह्या महिन्याचे श्रावण हे नाव ठेवण्यात आले असावे.
हिंदू धर्मात अनेक सण, उत्सव साजरे केले जातात आणि त्याची सुरुवात होते ती श्रावण महिन्यापासून!
तसेच हा महिना श्रवणाचा महिना देखील मानला जातो. कारण ठिकठिकाणी ह्या महिन्यात देवांच्या कहाण्यांचे तसेच पोथ्यांचे वाचन केले जाते व यातूनच निरनिराळ्या व्रतांची माहिती सुद्धा मिळविली जाते.
श्रावण महिन्याला सुरुवात झाली की, मधेच पाऊस तर मधेच ऊन पडत असतं. असा दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो.
श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा!!
अहो, याला कारण पण तसं आहे ना!
ह्या महिन्याच्या प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू परंपरा जी आहे!!
श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्व आहे कारण ह्या दिवशी सकाळी स्नान करून शिवशंकर महादेवाची उपासना केली जाते. तसेच यादिवशी उपवास करून महादेवाच्या पिंडीवर दूध, बेलपत्र वाहिली जातात.
असं म्हणतात बुआ की, कुमारिका इच्छित वर मिळावा म्हणून हे व्रत आवर्जून करतात.
काही ठिकाणी 'शिवलीलामृत' ह्या शिवशंकरांच्या ग्रंथाचे वाचन केले जाते. तसेच घरी गोडधोडाचे जेवण बनवून रात्री उपवास सोडायची प्रथा आहे.
हा महिना म्हणजे स्त्रियांचा आवडता!
ह्या महिन्यात असणाऱ्या वेगेवेगळ्या सण आणि उत्सवांच्या निमित्ताने त्यांच्या एकमेकांशी गाठीभेटी होतात, त्यांना नटता-मुरडता येते. तसेच ठिकठिकाणी झिम्मा-फुगड्या घालून जागरण ही केले जाते.
एकंदर श्रावण महिन्यामुळे सगळीकडे कसे प्रसन्न वातावरण निर्माण झालेले असते.
ह्या महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्म आणि गोपालकाला, पोळा हे सण सुद्धा साजरे केले जातात.
त्यांची माहिती पुढच्या भागात..
(मी लिहिलेली पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद)
@preetisawantdalvi

खूप छान माहिती
ReplyDeleteMast
ReplyDeleteSunder
ReplyDeleteChaan mahiti
ReplyDeleteKhup chan..
ReplyDeleteThanks
Deleteसुंदर
ReplyDeleteThanks..
DeleteChan
ReplyDeleteThanks..
DeleteNice
ReplyDeleteThanks..
Delete