गुंतता हृदय हे!! (भाग १५)





गौरीने समीरचा हात पकडून त्याला घरात आणले..तिने खोलीभर मंद प्रकाश ठेवला होता व टेबलावर सगळीकडे मेणबत्या लावल्या होत्या..सगळं वातावरण खूपच रोमँटिक दिसत होतं..

समीर काही बोलणार..इतक्यात गौरीने त्याच्या तोंडावर बोट ठेवलं आणि अगदी फिल्मीस्टाइल समीरला प्रपोज केलं..
ती म्हणाली, "समीर तुला पहिल्यांदा पाहताक्षणीच मी तुझ्यावर आकर्षित झाले होते आणि हळूहळू कधी तुझ्या प्रेमात पडले हे कळलं देखील नाही..त्यादिवशी तूला ऑफिसमध्ये बघून मी इतकी खुश झाले की, तुला सांगू शकत नाही..मी खूप खूप प्रेम करते तुझ्यावर समीर..एक दिवसासाठी नाही, एक क्षणासाठी नाही तर आयुष्यभरासाठी मला तुझी साथ हवी आहे..माझ्याशी लग्न करशील??"

समीर तिच्याकडे पाहून मंद हसला आणि म्हणाला,"गौरी तू खूप चांगली मुलगी आहेस आणि मला ही तू खूप आवडतेस..का कोण जाणे तुझा सहवास मला हवाहवासा वाटतो..तुला काही होणे... मी सहनच करू शकत नाही..म्हणून त्यादिवशी तू संकटात असताना मी कसल्याही परिणामांचा विचार न करता तुझ्यापर्यंत पोहोचलो..तुला सुखरूप बघून माझ्या जिवात जीव आला होता..मी जितका तुझ्यापासून लांब जायला बघतो तितका मी तुझ्या जवळ येतो..पण तरीही मी तुझा स्वीकार नाही करू शकत कारण माझा भूतकाळ.."

असे म्हणून समीर मधेच थांबला..गौरी सगळं लक्ष देऊन ऐकत होती..समीर थांबताच ती लगेच म्हणाली,"मला तो जाणून घेण्याची ही इच्छा नाही..पण मला तुझा वर्तमान आणि भविष्य व्हायचंय.."

तरीही समीरने गौरीला त्याच्या पूर्वआयुष्याविषयी सर्व काही सांगून टाकलं..त्याचे मुबंईहुन बेंगलोरला सेटल होण्याचं हेच तर कारण होत..गौरी हे सगळं ऐकून स्तब्ध झाली..

तिला हे ऐकून खूप वाईट वाटलं की, आजपर्यंत जो समीर फक्त तिचा आहे असे तिला वाटत होते..तो दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतो..पण तिला हे ही कळून चुकले की, समीरचे प्रेम हे एकतर्फी होते..पण तिने समीरला ते जाणवू दिले नाही..

पण समीरला ही हे माहीत होते की, आर्या फक्त अनिशवर प्रेम करत होती..आर्याचं खरं प्रेम तर RJ अमेयच्या आवाजावर होते..पण जेव्हा तिला कळले की, समीर हाच RJ अमेय आहे..तेव्हा ती दुःखी झाली..पण तिने हे स्वीकार केलं की, तिचं खरं प्रेम हे अनिशवरच आहे..

समीर मनात विचार करत होता की, आतापर्यंत तर आर्या आणि अनिशचे लग्न ही झाले असेल..पण तरीही आर्याला विसरणं या जन्मी तरी त्याला शक्य नव्हतं..आणि आता गौरी...???? असा विचार करता करता तो गौरीकडे पाहू लागला..

गौरी त्याच्याकडेच बघत उभी होती..तिला समीरकडून उत्तर हवं होतं..ती त्याचीच वाट पाहत होती..पण तिला जबरदस्तीने हे प्रेम जिंकायचं नव्हतं..कारण मग त्या प्रेमाला काहीच अर्थ राहिला नसता..

ती समीरजवळ गेली आणि तिने समीरचा हात तिच्या हातात घेतला आणि ती म्हणाली,"समीर मला माहीत आहे..पहिलं प्रेम प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचं असतं..आपण त्यासाठी आपलं सर्वस्व वाहून टाकतो..कसल्याही परिणामांचा विचार न करता आणि एक दिवस जेव्हा आपल्याला कळतं की, ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय त्याचं प्रेम दुसऱ्याच कोणा व्यक्तीवर आहे..तेव्हा ज्या वेदना होतात त्या शब्दांत नाही मांडता येत..कधीकाळी तू जिथे उभा होतास..तिथेच मी आज उभी आहे..मला जे वाटतंय..ज्या वेदना होताएत त्या फक्त तू आणि तूच समजू शकतोस..पण तरीही मी तुला जबरदस्ती करणार नाही..पण हा माझा विश्वास आहे की, एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमाला नक्की समजशील..आणि मी त्या दिवसाची वाट पाहीन" असं बोलून गौरी तिच्या खोलीत निघून गेली..

मग तो ही त्याच्या घरी निघून गेला..रात्रभर त्याच्या मनात गौरीचे विचार येत होते..आज पहिल्यांदा त्याला आर्याची अजिबात आठवण आली नाही..त्याला गौरीशी झालेली त्याची पहिली भेट आणि त्यानंतर तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवू लागला..त्याला मनात खूप छान वाटत होते की, कोणतरी आहे जे त्याच्यावर त्याच्यापेक्षा ही जास्त प्रेम करते..पण आज त्याने गौरीचं मन दुखवलं होतं..याचं त्याला खूप वाईट वाटलं..आणि त्याने मनाशी निश्चय केला की, उद्याच तो गौरीला तिच्याबद्दलच्या त्याच्या मनातील भावना सांगेल व तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला..

सकाळी लवकर उठून त्याने शास्त्रींच्या घराची बेल वाजवली..पण २-३ वेला वाजवून ही गौरीने दरवाजा उघडला नाही..मग त्याने तिला फोन करायचे ठरविले..तर तिचा फोन बंद होता..समीर खूप काळजीत पडला..त्याच्या मनात नको नको ते संशय यायला लागले..म्हणून त्याने पुन्हा एकदा दारावरची बेल वाजवली आणि गौरीला फोन सुद्धा केला..पण पुन्हा तेच झालं..आता मात्र त्याला खात्री झाली की, गौरीने स्वतःच्या जीवाचं बरंवाईट तर केलं नसेल..म्हणून त्याने दरवाजाला हिसका दिला..पण ते उघडणं त्याला शक्य होईना..मग त्याने चावीवाल्याला बोलवायचं ठरविले..पण जर वॉचमनला सांगितलं तर तो उगीच बिल्डिंगमध्ये हाहाकार करेल..म्हणून तो स्वतःच खाली गेला आणि चावीवाल्याला घेऊन आला..तो दरवाजा उघडेपर्यंत समीर गौरीला फोन लावत होता..पण समोरून अजूनही फोन बंद होता..

काही वेळानंतर शास्त्रींच्या घरचा दरवाजा उघडला..तसं समीर घाईघाईत आत गेला आणि सगळीकडे गौरीला शोधू लागला..पण आश्चर्य!!

घरात कुणीच नव्हते..गौरीचा फोन डायनींग टेबलवर होता आणि तो खरच बंद होता..समीर विचारात पडला की, गौरी कुठे आहे? इतक्यात चावीवाल्याचा आवाज आला..त्या आवाजाने समीर भानावर आला त्याने त्याचे पैसे दिले आणि तो चावीवाला निघून गेला..समीर परत सर्व घरात गौरीला शोधू लागला..इतक्यात गौरी घरी आली आणि तिने लिफ्टकडे चावीवाल्याला पाहिले होते..हा कोण माणूस हा ती विचार करतच होती, इतक्यात तिला तिच्या घराचा दरवाजा सताड उघडा दिसला..गौरी घाबरली आणि तिने तिच्या हातातलं सामान दरवाज्यातच टाकलं व ती धावतच घरात गेली..तर आत समीर होता..समीरचे ही लक्ष गौरीकडे गेले..

गौरीला पाहताच तो खूप खुश झाला..त्याने लगेच तिला घट्ट मिठी मारली..गौरीला काहीच कळतं नव्हते की, काय चालययं ते..ती शांत उभी होती..

समीर बोलू लागला, "कुठे गेली होतीस? मी किती टेन्शन मध्ये आलेलो माहीत आहे तुला..फोन का बंद ठेवला आहेस? खूप वेळ बेल वाजवून पण जेव्हा तू दरवाजा उघडला नाहीस, तेव्हा मनात नको नको ते विचार आले..तुला काही झालं असतं तर मी काय करणार होतो..मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय गौरी..मी रात्रभर खूप विचार केला आणि आज सकाळी तुला हो बोलायचं असं ठरविलं..पण जेव्हा तू दरवाजा नाही उघडलास आणि तुझा फोन ही बंद आला तेव्हा.." असे म्हणून तो क्षणभर थांबला आणि तो त्याच्या गुढघ्यांवर बसला व त्याने गौरीचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, "मी माझे पाहिले प्रेम कधीच नाही विसरू शकत..पण मी तुला हरवून ही नाही जगू शकत..मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करेन आणि तुला खूप खुश ठेवीन..माझ्याशी लग्न करशील??"

गौरी हे ऐकून खूप आनंदी झाली तिने खाली बसून समीरला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या प्रश्नाला होकार दर्शवला..
आणि कुठूनतरी हे गाणं ऐकू येत होतं..

🎶तेरे लिए जानम तेरे लिए
ये मेरी साँसें, ये मेरा जीवन
बिन तेरे जीना भी क्या
तेरे लिए जानम तेरे लिए।।
होगी कोई ना ऐसी दीवानी
तुझसे जूड़ी है मेरी कहानी
होगी कोई ना ऐसी दीवानी
तुझसे जूड़ी है मेरी कहानी
तेरी वफ़ा के आगे में हारा
आँखों में तेरा चेहरा उतारा
साथ जीना है, तेरे साथ मरना है
हर घडी सनम बस प्यार करना है
मैं तो दीवाना हुआ
तेरे लिए जानम तेरे लिए🎶

क्रमश:




(ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की share करा..)


©preetisawantdalvi

No comments:

Post a Comment